स्मार्टदोस्त आपल्याला प्रत्येक गोष्टीचे 5 उदाहरण किंवा मुद्दे सांगतो.
स्मार्टदोस्त खरोखरच स्मार्ट आहे.
उदाहरणार्थ
1. भारताची 5 रहस्ये – सोडवता न आलेली
हजारो वर्षांचा इतिहास असणारा भारत हा एक मोठा देश, ज्यामध्ये सतत काही ना काही घडत असते. काही घटना आपल्याला अगदी सहज सर्व काही सांगून जातात. परंतु काही अकल्पित घटना रहस्ये बनून राहतात. वर्षानुवर्षे तपास करूनसुध्दा ही रहस्ये उकलता येत नाहीत. स्मार्टदोस्तने अशाच न सोडवता आलेल्या भारतीय रहस्यांची यादी केली आहे.
2. अतिप्राचित ५ गूढ आकृत्या ज्या तुम्हाला वेगळया विश्वात नेतील.
मानवाचा ज्ञात इतिहास फार थोडा आहे. अज्ञात अतिप्राचीन काळी आपण कोण होतो किंवा त्याकाळी पृथ्वीवर कोण राज्य करीत होते हे अजूनही कोडे आहे. आता पहा ही स्मार्ट दोस्तची यादी. जगभरातील गूढ आकृत्या ज्या कोणी काढल्या व कोणासाठी हे आजअखेर कोणासही समजले नाही. अतिप्रचंड गूढ आकृत्या ज्या फक्त अवकाशातूनच दिसू शकतात.
3.नाहीशी झालेली 5 पूरातन शहरे
भविष्याचा विचार करण्याची क्षमता असणारी प्रजाती म्हणून मानवजातीची ओळख करून देता येईल. परिस्थीतीचा अंदाज घेवून आपल्या बूध्दीच्या बळावर मानव जातीने फारच थोड्या काळात पृथ्वीवर अनेक बदल घडवून आणले. अनेक शोध लावले तसेच राहण्यासाठी शहरेही वसवली. ही शहरे कालांतराने नाहीशीही झाली. भारतातील (सध्या पाकीस्तानमध्ये) हडाप्पा-मोहेंजदडो हे एक त्याचेच उदाहरण.
पुरातनकाळी समृध्द असलेली ही शहरे आपला ठसा उमटवून आणि गूढ मागे ठेवून लूप्तझाली. स्मार्टदोस्तने अशाच नाहीश्या झालेल्या शहरांची यादी बनवली आहे.
4. पृथ्वीवरील 5 नैसर्गिक चमत्कार
सौरमालेत सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असणारी आपली पृथ्वी मूळातच एक नैसर्गिक चमत्कार आहे. मोफत ऑक्सीजन, मोफत पिण्याचे पाणी आणि पोषक वातावरण देणाऱ्या या पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जी निसर्गाचे चमत्कारीक रूप दाखवून देतात. निसर्गाचे हे रूप पाहिल्यावर मानवाच्या स्वतःला ग्रेट समजण्याच्या वल्गना किती फोल आहेत ते लगेच समजते.
5.अलौकीक संतूलन असणार्या ५ शिळा
एका पायावर तासन तास उभे राहून जप करणारे साधू आपण पाहतोच. देवाचे नामस्मरण करत शरीराचे संतूलन केवळ एका पायावर करत स्तब्ध उभारले हे योगी आपणास वेगळ्या शक्तीची आठवण करून देतात. निसर्गाने सुध्दा असे चमत्कार करून दाखवले आहेत. केवळ थोड्याशा आधारावर वर्षानूवर्षे काही शिळा उन, वारा, पावसाचा आघात सहन करीत स्तब्ध उभ्या असलेल्या जगाच्या अनेक भागामध्ये दिसतात. स्मार्टदोस्तने अशाच अलौकीक संतूलन असणार्या शिळांविषयी माहिती मिळवली आहे.
वाचा आणखी बरेच काही स्मार्टदोस्त वर
स्मार्टदोस्त वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीच ठरवा आहे कि नाही स्मार्ट दोस्त !