जगातला सर्वात कुप्रसिद्ध हॅकर !


केविन मिटनिक हे नाव ऐकल्यावर एफ.बी आय च्या भल्या भल्या सायबर एक्सपर्ट ची बोबडी वळते.
कोण आहे हा केविन मिटनिक ? हा इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध  हॅकर आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धत अनेक कंम्पुटर आणि नेटवर्क हॅकिंग च्या अनेक गुन्ह्यात दोषी अढळला आहे.


वयाच्या बाराव्या वर्षी मिटनिक ने सोशल इंजिनिअरिंग द्वारे लॉस एंजलिस च्या बस मधील पंचकार्ड सिस्टिम ला मत केली. झालं काय कि त्याने एका बस ड्राईवर सोबत दोस्ती केली. ड्राईवर ने याला पंचकार्ड कुठे बनतात याचे ठिकाण सांगितले. मिटनिक ने तेथील कचरा पेटीतील पंचकार्डात फेराफेर करून शहरात मोफत प्रवास करू लागला. युजरनेम,पासवर्ड, मोडेम नंबर, मोबाईल नंबर इत्यादी गोष्टी मिळविण्यसाठी मिटनिक सोशल इंजिनीअरिंग चा वापर करू लागला.
हायस्कूल मध्ये असताना तो फोन फ्रीकिंग ची पद्धत शिकला.फोन फ्रीकिंग म्हणजे टेलीफोन कॉल्स मध्ये हेराफेरी करणे.याचा उपयोग करून तो लांब अंतरचे कॉल्स करत असे.
1979 साली वयाच्या सोळाया वर्षी मिटनिक ने  डिजिटल इक्वीपमेंट कॉर्पोरेशन या आर एस टी एस/इ (RSTS/इ) ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेयर बनविणाऱ्या कंपनीचे नेटवर्क हॅक करून आपल्या हॅकिंग च्या करियर चा श्रीगणेशा केला(या कारनाम्या साठी पुढे त्याला $160,000 दंड भरावा लागला ! )
पुढे त्याने DEC च्या कंम्पुटर नेटवर्क मध्ये घुसून त्यांच्या सॉफ्टवेअर ची कॉपी केली.
या अपराधासाठी त्याला 1988 साली आरोपी व नंतर दोषी ठरवण्यात आले. मिटनिकलं या गुन्ह्यासाठी 12 महिने तुरुंगवास आणि पुढील 3 वर्ष साठी पोलीस देखरेखीत ठेवण्यात आले.
मिटनिकचा पोलीस देखरेखीच काळ संपतच आला होता किच महाशयांनी "पॅसिफिक बेल" नावाच्या वॉइस मेल कंप्यूटरला हॅक केले. या विरुद्ध पोलीस तपसा सुरु होताच मिटनिकने पळ काढला. पुढील अडीच वर्ष तो भूमिगत होता.
यू.एस.डिपार्टमैंट ऑफ जस्टिस च्या अहवाला नुसार जेंव्हा तो भूमिगत होता तेंव्हा त्याने डझनभर नेटवर्क्स वर अनधिकृतपणे ताबा मिळवला होता.


मिटनिक ने आपले ठिकाण पोलीसांपासून लपवण्यासाठी क्लोन सेल फोनचा वापर करून  नोकिया,मोटोरेलो सारख्या बड्या  कंपन्याचंचे ट्रेडमार्कयुक्त  सॉफ्टवेयरची गोपनीय माहिती चोरली.याच कालखंडात त्याने संता क्रूज़ ऑपरेशन,एफ.बी आय, पेन्टागण च्या सिस्टिम मध्ये घुसला.एवढयावरच न थांबता मिटनिक ने कंम्पुटर चे पासवर्ड चोरले, नेटवर्क्स मध्ये बदल केले ,हजारो एफ.बी आय एजेन्ट्स चे मेल पण वाचले. या घटनेने  एफ.बी आय मध्ये हाहाकार उडाला. त्याला पकडण्यासाठी अमेरिकन सरकारने सर्व शर्थ पणाला लावले.
मिटनिकला शोधण्यासाठी खुप प्रचार आणि प्रसार करवा लागला 2.5 वर्ष पर्यंत हॅकिंग करून पोलिसांना सळो कि पळो करून सोडले होते. अखेर 15 फेब्रुवारी 1995 मध्ये पोलिसंच्या पाठलाग नंतर मिटनिकला पकडण्यात यश आले. त्याला पकडल्यावर त्याच्याकडून शंभरहून अधिक क्लोन सेल फोन व त्यांचे पासवर्ड आणि शेकडो खोटे ओळखपत्र जप्त करण्यात आले.
त्याच्या वरील  बरेच आरोप पुराव्याच्या अभावी सिद्ध होऊ शकले नाही. जे आरोप सिद्ध झालेत त्यामुळे त्याला 46 महिण्याचा तुरुंगवास वास व पुढील 3 वर्ष साठी पोलीस देखरेख हि शिक्षा झाली.तो पर्यंत अमेरिकेत मिटनिक साहेबांचे हजारो फॅन्स तयार झाले होते. मिटनिक साहेबांच्या अटकेच्या निषेधार्त अनेक सरकारी वेबसाईटस त्यांच्या फॅन्स नि हॅक केल्या.
21 जानेवारी 2000 साली तो तुरुंगातून सुटून आला.आता  3 वर्ष पोलीस देखरेख होती. पोलीस देखरेखीच्या काळात पोलिसांनी त्याला लैंडलाइन शिवाय कुठले हि संपर्क यंत्र वापरण्याची पोलिसांनी बंदी घातली.
मिटनिक महाशयांनी या विरोधात "मानवी मुलभूत हक्क" या नाव खाली आपल्या "न्याय हक्का" साठी लढा दिला व शेवटी कोर्टाने पण त्यांना इंटरनेट वापरण्याची परवानगी दिली.
आत्ता मिटनिक स्वतची Mitnic Security नावाची कंपनी चालवत आहेत.
मिटनिक ची कहाणी Tech4Marathi वर संपली असली तरी टी भविष्य काळात पुढे चालूच राहणार आहे ...

धन्यवाद  !2 comments:

  1. माणूस जिनिअस आहे, उचापत्यामुळेच गेला...........
    बाकी लेख छान झाला......

    ReplyDelete
  2. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

    ReplyDelete