असा होता स्टीव्ह जॉब्स !

आज स्टीव्ह जॉब्स यांची पुण्यतिथी.मी माझ्या जीवनात सर्वात मोठा आदर्श मानतो तो म्हणजे स्टीव्ह जॉब्स.
तीन सफरचंदांनी जगाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य बदलले. यातील पहिले अ‍ॅडम आणि इव्हच्या कहाणीतले होते आणि त्यामुळे विश्वाची निर्मिती झाली असे मानले जाते. दुसरे सफरचंद झाडावरून पडले आणि ते पाहणाऱ्या न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची संकल्पना सुचली. आणि तिसऱ्या सफरचंदाने जगाला स्टिव्ह जॉब्सचे अ‍ॅपल दिले.
 स्टिव्ह जॉब्सने जॉन स्कली लं विचारले कि "आयुष्यभर हे गुळचट पाणी विकणार आहेस का ? माझ्या बरोबर ये आपण जग बदलू" यास विचारले तेव्हा स्टिव्ह अवघा २८ वर्षांचा होता आणि जॉनचे वय होते ४४. असा प्रश्न विचारला त्यावेळी स्टिव्हची कंपनी अडखळत होती आणि त्याचवेळी जॉन हा पेप्सी या जगातल्या बलाढय़ कंपनीचा अध्यक्ष होता. पण आपण जगाला नवे काही देऊन जाणार आहोत याची कमालीची खात्री स्टिव्हला होती आणि त्यातूनच आलेल्या एक प्रकारच्या आध्यात्मिक औद्धत्यातून तो जगाकडे बघत.  अमेरिकेने जगाला अनेक धनसंपन्न उद्योगपती दिले पण स्टिव्ह जॉब्स विषयी असलेले प्रेम , आदर दुसर्या कुणाच्याही वाट्याला आला नाही. तर दुसर्या बाजूने जी कंपनी आपण गॅरेज मध्ये सुरु केली जिच्यासाठी इतकी मेहनत घेतली त्याच कंपनी मधून त्यालं बाहेर काढण्यात आले असा बिकट क्षण पण कुणाच्या वाट्याला आला नाही. अ‍ॅपल , अ‍ॅपल II, मॅकिंतोष हे संगणक काढून विंडोज च्या मक्तेदारीला"कांटे कि टक्कर" दिली.स्टिव्ह जॉब्सला स्वत:च्या बौद्धिक संपदेवर त्याचा विश्वास होता आणि त्यामुळे प्रसंगी त्याची गर्विष्ठ अशीही संभावना झाली. पण जग आपल्याच मागे येईल असा ठाम विश्वास त्याला होता. स्टिव्ह जॉब्स ने  आयपॉड आणि आयपॅड उत्पादने काढून तंत्रज्ञान जगतात अभूतपूर्व क्रांती केली. त्याकाळी वाॅकमन फार प्रसिद्ध होते. त्यातली संगीत साठवून ठेवण्याच्या पद्धतीचा स्टिव्ह जॉब्स ने विलक्षण वापर केला. चार-पाच संगणकात साठवता येणार नाही इतके संगीत आणि सिनेमा मुठभर आयपॉडमध्ये ठेवता  येण्यची पद्धत पाहून जग अवाक झाले. एमपी ३ प्लेयरची क्रांतिकारी निर्मिती करून स्टीव्ह जॉब्सचे समाधान झाले नव्हते. लोकांसाठी त्याला एक नवे उत्पादन द्यायचे होते. आय टय़ून्स ही त्याचीच झलक होती. म्युझिक फाईल्स वाजवण्यासाठी आय टय़ून्सच्या निमित्ताने सुरुवात झाली परंतुकालौघात पृथ्वीतलावरील सर्वात मोठे म्युझिक स्टोर्स’ म्हणून आय टय़ून्सची दखल घेतली गेली. हा जगातील सर्वात लोकप्रिय म्युझिक प्लेयर म्हणून गणला जात आहे.स्टिव्ह तेवढय़ावरच थांबला नाही तर पुढे जाऊन त्याने फोन, संगणक आणि आयपॉड हे एकत्र आणून आयपॅड तयार केले. ही क्रांती होती आणि ती कमी म्हणून की काय त्याने आपला स्वत:चा आयफोन विकसित केला. त्याचाच नवा अवतार बाजारात येऊन दोन दिवसही व्हायच्या आत स्टिव्हला हे जग सोडून जावे लागले. आज एक देश असा नाही की ज्या देशातील तरुणाईचे, निर्मितीवंतांचे डोळे स्टिव्ह जॉब्स याच्या निधनाने ओले झाले नसतील. Tech4Marathi तर्फे या अवलियाला श्रद्धांजली ! 
धन्यवाद !


स्टिव्ह जॉब्स यांचे जगप्रसिद्ध भाषण हिंदी मध्ये पहा 







2 comments:

  1. I am a management student and I am the biggest follower of steve jobbs. He is my idol and his life always inspired me!
    Your blog on steve job is really good!

    ReplyDelete
  2. I am a management student and I am the biggest follower of steve jobbs. He is my idol and his life always inspired me!
    Your blog on steve job is really good!

    ReplyDelete