फायरफॉक्स मध्ये जाहिराती ब्लॉक करा

इंटरनेट वर चा वापर करत असतान बऱ्याच जणांना जाहीरातींच खूप त्रास होतो. काही वेबसाईटवर भरपूर जाहिराती असतात त्यामुळे आपल्याला ते वेबपेज दिसण्यास खूप लोड घेते. चुकून जर तुम्ही अश्या भलत्याच लिंक वर क्लीक केल्यास त्यात मालवेअर किंवा वायरस असण्याची दाट शक्यात असते. तेंव्हा यांच्या पासून दूर राहायचे असल्यास जाहिराती ब्लॉक करणे फायद्यचे ठरते.फायरफॉक्स हा सर्वात लोकप्रिय इंटरनेट ब्राउजर पैकी एक आहे. या ब्राउजर चे मुख्य वैशिष्ट म्हणजे यात उपलब्ध असलेले लाखो अॅडआॅन जे आपली ब्राउजिंग अधिक सोपी करतात. त्यापैकी एक म्हणजे Hello Boy.

Hello Boy हे अॅडआॅन आपल्याला एखाद्या चित्रपतातील सुपरहिरो प्रमाणे आपल्याला जाहिराती पासून सुटका करून देतो. आता तुम्ही म्हणालं कि फायरफॉक्स साठी अगोदरच भरपूर अॅडब्लॉकर्स उपलब्ध असताना आम्ही Hello Boy का वापरावा? 

तर याचे उत्तरं आहे याची साईज आणि वेग.
Hello Boy मध्ये तुम्हला इतर अॅडब्लॉकर्स प्रमाणे गोंधळून टाकणारे पर्याय मिळणार नाहीत. परंतु कमीत कमी फीचर्स मध्ये जास्त जाहिराती ब्लॉक करण्यासठी हे अॅडआॅन सक्षम आहे.

खाली मी या अॅडआॅन ची डाऊनलोड लिंक देत आहे. डाऊनलोड झाल्यानंतर Open With मधून फायरफॉक्स निवडावे जेणेकरून ते आपोपाप फायरफॉक्स मध्ये इंस्टाल व्हावे.


Hello Boy इंस्टाल झाल्यानंतर उजव्या बाजूला असे चिन्ह येईल 
आत्ता एखादे जाहिराती असणारे संकेत स्थळ ओपन करून बघा उदा. www.filehippo.com 
तुमचे अॅडआॅन काम करेल.

धन्यवाद !

डाऊनलोड करण्यासठी खाली क्लीक  करा