गूगलचे क्रोमकास्ट

गूगल काकांनी आपल्या सर्व वर्चुअल आयुष्याचा ताबा घेतला आहे. गूगल सर्च पासून ते जीमेल, ब्लॉगर पर्यंतच्या दर्जेदार सुविधा मोफत(?) पुरवीत आहेत. त्या बद्दला मी त्यांचा आभारी आहे. आता गूगलकाका आपल्या दैनदिन जीवनात हि पोहचले आहेत ! हो मी त्यांच्या नवीन उत्पादना बाबत बोलत आहे. क्रोमकास्ट.

क्रोमकास्ट आपल्या मोबाईल, लॅपटॅाप आणि टॅब ला टीव्ही शी जोडेल आणि तुमच्या टीव्हिला बनवेल स्मार्ट टीव्ही.  
समजले नाही ? खालील चित्रे पहा 


 लॅपटॅाप टीव्ही शी कनेक्ट करणे. मोबाईल आणि टॅब टीव्ही शी कनेक्ट करणेया साठी तुम्हाला या तीन गोष्टीची गरज असणार आहे.

1) HDMI पोर्ट असलेली टीव्ही (HDTV)
2)WIFI असलेले मोबाईल, लॅपटॅाप किंवा टॅब.
3) क्रोमकास्ट 

क्रोमकास्ट हे एक पेनड्राइव च्या आकारच साधन आहे जेकी WiFi वर काम करतो. 

आपल्या टीव्हीला जोडल्यानंतर 

आपल्यला फक्त एवढच कराव लागणार आहे कि क्रोमकास्ट हे टीव्हीला जोडून सेटिंग करायची  आणि क्रोमकास्ट चे प्पलीकेशन आपल्या मोबाईल किंवा टॅब डाऊनलोड करून WiFi च्या द्वारे कनेक्ट करायचं.

हा विडीओ बघा 

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुमच्या टीवीच्या मोठ्या स्क्रीनवर मोबाईल, लॅपटॅाप किंवा टॅब मधील सर्व फीचर्सचा आनंद घेऊ शकता.क्रोमकास्टची किंमत $35 आहे म्हणजे 2100rs. सध्या तरी हे भारतात उपलब्ध नाही. लवकरच बाजारात येईल.
गूगलकाकंचा का प्रयोग कितपत यशस्वी होईल ते लवकरच कळेल.
धन्यवाद !