उबुंटू काय आहे ?

उबुंटू काय आहे ? हा बऱ्याचजनान पडलेला प्रश्न. आजच्या लेखात मी उबुंटू विषयी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीन. शब्दश: पाहायला गेलं तर उबुंटू हे एक तत्त्वज्ञान आहे . आफ्रिकेतील. माणुसकीच तत्वज्ञान .
पण मी ज्या उबुंटु बाबत सांगत आहे ती एक Operating System आहे.


उबुंटू मधील डेस्कटॉपउबुंटू हि एक मुक्तस्त्रोत संगणक प्रणाली म्हणजेच OpenSource Operating System आहे .लिनक्स च्या ज्या Operating systems आहेत त्या पैकी एक .उबुंटू चे वैशिष्ट म्हणजे ती पूर्णपने विनामूल्य (चक्क फुकट ).उबुंटू ला आत्तापर्यंत तरी वायरसची बाधा झाली नाही. म्हणजेच उबुंटू एक Virus Free Os आहे.
उबुटू वापरायला खूप कोडींग करावी लागते हा एक (गैर)समज आहे. बऱ्याच लिनक्स OS ह्या पूर्णपणे कामांड वर चालता पण उबुंटू हि युजर फ्रेंडली ( विंडोज सारखी). वापरायला अतिशय सोपी जलद, ताकदवान आणि कमालीची सुरक्षितता हि काही उबुंटू ची खास वैशिष्ट्य. विंडोज कितीतरी पटीने सरस, ‌‍डोळ्यांना सुखवनारा ग्राफिकल इंटरफेस असून हि उबुंटू भारतात तितक्या प्रमाणात तिचा वापर होत नाही . आपल्याकडे फुकटची वस्तू म्हटली कि तिला 'किंमत' नसते असे म्हणतात.आपण सर्वजन विंडोज वर सोफ्टवेअर विकत घेऊन वापरतो (?) या उलट उबुंटू वरील सर्व सोफ्टवेअर हे विनामूल्य उपलब्ध आहेत. आता राहिला प्रश्न ऑफिस सूट्स चा तर उबुंटू मध्ये MS-Office  पेक्षा समृद्ध असा Libere Office हा प्रोग्राम आहे. सर्वात आनंदची बातमी म्हणजे आपण विंडोज आणि उबुंटू एकाच संगणकावर वर वापरू शकतो. म्हणजेच जर तुम्हला विंडोज ची गरज पडल्यास तुम्ही एक क्षणी विंडोज वर जाऊ शकता.


तेंव्हा उबुंटू बिनधास्त इंस्टाल करा 
www.ubuntu.com/download

काही अडचण आल्यास मी आहे ना !