आता आलासॅमसंग गॅलेक्सी एस-५

अॅपलला 'काँटे की टक्कर' देण्यासाठी झपाटून
काम करणारी सॅमसंग कंपनी येत्या २४
फेब्रुवारीला मोठा धमाका करण्यासाठी सज्ज
झाली आहे. बार्सिलोनामध्ये होणा-
या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सॅमसंग
आपल्या सगळ्यात 'हायफंडू' स्मार्टफोनचं,
गॅलेक्सी एस-५ चं अनावरण करणार आहे. 'अॅपल ५-
एस'ला मूहतोड जबाब देण्याचाच त्यांचा प्रयत्न
आहे.

भारताच्या मोबाइल बाजारपेठेत सॅमसंगनं अव्वल
स्थान पटकावलंय. त्यांच्या गॅलेक्सी सीरिजवर तर
तरुणाई फिदाच आहे. त्यामुळे
सॅमसंगच्या स्मार्टफोनची सारेच आतूरतेनं वाट
पाहत असतात. स्वाभाविकच, एस-४ नंतर सगळेच
गॅलेक्सी एस-५ ची आतूरतेनं वाट बघत होते.
त्याच्या लाँचिंगबद्दल
सॅमसंगप्रेमींना उत्सुकता होती.
बार्सिलोनाच्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये
(एमडब्ल्यूसी) सॅमसंग ही झळाळती भेट देणार का,
याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. परंतु, या सर्व
शक्याशक्यतांवर सॅमसंगनं आज पडदा पाडला. ते २४
फेब्रुवारीला एमडब्ल्यूसीमध्येच 'अनपॅक्ड ५'
नावाचा इव्हेंट करणार असून त्यात गॅलेक्सी एस-५चं
अनावरण होणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस-५ कसा असेल, कसा दिसेल, हे सगळं
कंपनीनं गुलदस्त्यातच ठेवलं असलं तरी त्याची काही फीचर्स आतल्या गोटातून
कळली आहे. एस-५ची स्क्रीन ५ ते ५.२ इंचाची असेल.
फोटोप्रेमींसाठी या स्मार्टफोनमुळे १३
मेगा पिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनची रॅम ३ जीबी असेल, तर इंटरनल स्टोरेज
३२ आणि ६४ जीबी असेल, असं समजतं.
सॅमसंग गॅलेक्सी एस-४ ला संमिश्र प्रतिसाद
मिळाला होता. हा फोन
सॅमसंगच्या चाहत्यांनाही फार आवडला नव्हता.
त्यामुळे आता त्यांच्या अपेक्षा एस-५ पूर्ण करणार
का, यावर बरंच काही ठरणार आहे.
Sansung Galaxy S5
By:-Sarpate007@gmail.com